अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील अगस्ति ज्ञानस्त्रोत केंद्रात आज भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसा निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, मा. सचिव श्री. सुधाकरराव देशमुख, संस्थेचे शिक्षणाधिकारी मा. श्री. एस. पी. मालुंजकर, श्री. जेडगुले सर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी खेमनर, ग्रंथपाल श्री. प्रदीप बच्छाव, डॉ. प्रवीण घुले, श्री. भालेराव, श्री. प्रतिक मालुंजकर, श्रीमती धुमाळ, श्रीमती भुजबळ, श्रीमती देशमुख, प्रा. डॉ. जाधव, प्रा. डॉ. सोनवणे, प्रा. डॉ. मोहटे, प्रा. डॉ. घनकुटे, प्रा. डॉ. वावळे, प्रा. नाईकवाडी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. चांगदेव डोंगरे, सुपरवायझर प्रा. विवेक वाकचौरे व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर यांच्या हस्ते व मा. सचिव श्री. सुधाकरराव देशमुख, संस्थेचे शिक्षणाधिकारी मा. श्री. एस. पी. मालुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी खेमनर, प्राध्यापक, शिक्षक ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन श्री. कुसळकर यांनी लिहिलेला लेख वाचनाचे तसेच ग्रंथालयांचे महत्व लक्षात आणून देतो. या दिवसा निमित्त वाणिज्य विभाग प्रमुख, कॅप्टन डॉ. एस. ए. पाळंदे सर यांनी ग्रंथालयास विद्यार्थां समवेत भेट देवून स्वलिखित (Methods of Costing) पुस्तक भेट दिले. या दिवसाचे औचित्य साधून ग्रंथालय ओळख कार्यक्रमास बहुसंख्येणे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास भेट दिली.
- ग्रंथपाल प्रा. प्रदीप बच्छाव
श्री. विशाल दारोळे व श्री. साहिल पठाण यांनी टिपलेले काही क्षण …










