सौ.धारा भांड- मालुंजकर मॅडम व लेखक बाबा भांड यांनी आपल्या अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले (अहमदनगर) ग्रंथालयास देणगी स्वरूपात दिलेली ‘ महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन ,औरंगाबाद यांचेमार्फत प्रकाशीत झालेली ‘ आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या महान कार्याचा आढावा घेणारी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील ग्रंथसूचीमधील सर्व ६५ संदर्भपुस्तके आज शुक्रवार दि. १०/०३/२०२३ रोजी ग्रंथालयाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून ते दालन वाचकांसाठी खुले करून देण्यात आले.
डिस्प्लेवर लावलेल्या पुस्तकांसोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके,राजूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रावसाहेब ननावरे सर,संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री.संपतराव मालुंजकर, ग्रंथपाल व महाविद्यालयातील स्टाफ उपस्थित होता. आपण दिलेल्या ग्रंथरूपी देणगीबद्दल आपले व माननीय बाबा भांड साहेबांचे खूप खूप आभार.