ग्रंथालयात नवी सेवा – प्रेरणादायी सिनेमा दर्शन

ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचनाचे केंद्र नसून सामाजिक, वैज्ञानिक आणि वैचारिक जाणीवा वाढविणारे प्रबोधनाचे माध्यम देखील आहे. हाच विचार लक्षात घेऊन ग्रंथालयात प्रेरणादायी, सामाजिक तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी नवी सेवा सुरू करण्यात येत आहे.

या नव्या उपक्रमांतर्गत दर शनिवारी उत्कृष्ट आणि निवडक सिनेमांचे प्रक्षेपण केले जाईल. या सिनेमांद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकवर्गामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, तसेच ज्ञानवृद्धीसोबतच सांस्कृतिक जाणिवा दृढ करण्यास मदत होईल.

👉 यासाठी काही निवडक सिनेमांची निवड करण्यात आली असून इच्छुकांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. QR Code ग्रंथालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.

पहिला सिनेमा – 12th Fail

📅 दि. २३ ऑगस्ट २०२५
🕧 वेळ : दुपारी १२:३० वाजता
📍 स्थळ : ग्रंथालय

हा सिनेमा विद्यार्थ्यांना संघर्षातून यशाकडे नेणारा, प्रेरणादायी कथा सांगतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाताना चिकाटी, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांची किती आवश्यकता असते हे यातून अधोरेखित केले आहे.

✨ सर्व वाचक, विद्यार्थी व इच्छुकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
आपली नोंदणी तातडीने करा आणि प्रेरणादायी सिनेमासफरीचा भाग बना!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top