गोष्ट पैशापाण्याची

By प्रफुल्ल देशपांडे

Availability

available

Publish Date

2022-01-01

Published Year

2022

ISBN

978-93-8934-84-0

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

गोष्ट पैशापाण्याची

मला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणी मधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेक मालिका खूप गाजली. त्या लेखांचे पुस्तक करण्याचा सकाळ प्रकाशनाने जो निर्णय...Read More

डॉ. पंकज नाईकवाडी

डॉ. पंकज नाईकवाडी

×
गोष्ट पैशापाण्याची

मला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणी मधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेक मालिका खूप गाजली. त्या लेखांचे पुस्तक करण्याचा सकाळ प्रकाशनाने जो निर्णय घेतला. हि खूप मोठी गोष्ट आहे.

जग प्रचंड वेगाने बदलत आहे त्या बदलाचा अनुभव घेत आपण सध्या जगत आहोत. त्यामुळे हे पुस्तक अतिशय योग्य वेळी आपल्या हाती येत आहे. तंत्रज्ञानाने आपले सर्व जीवन व्यापून टाकले आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्याने आपण सगळे जोडले गेलो आहोत. कुठल्याही वेळी आपण एकमेकांसाठी उपलब्ध राहू शकतो हे याआधी कधीही शक्य झाले नव्हते. इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्यामुळे सर्व जग जवळ आले आहे. आपण एकमेकांशी जोडले गेलो आणि त्यासाठीची किंमतही अतिशय माफक सर्वांना परवडणारी आहे.

जग बदलतेय, तथा भारतही बदलतोय जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्या आपला समावेश होतो आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेत आपला समावेश होईल.

कोरोनाने सगळे वर्क कल्चर बदलून गेले  आहे. आपल्यातल्या अनेकांना वर्क फ्रॉम होम करायला करून आणि भाग पाडले आहे. गेल्या दोन वर्षात Work from Home चे आता Work from Anywhere  झाले आहे. कुठूनही आणि कोणासाठीही काम करण्याच्या लवचिकपणाचा एक परिणाम म्हणजे आपण गिग इकॉनोमी कडे जात आहोत. आयुष्यभरासाठी कायम लोकरी किंवा रोजगार ही संकल्पना आता इतिहास जमा झाली आहे. आता आयुष्यभरात एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील नोकरी एके नोकरी असे करून चालणार नाही. तसेही पूर्णपणे नवीन नाही अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मध्ये हे होत असते एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना अनेक क्रिएटिव्ह लोक एकत्र येतात तो प्रोजेक्ट पूर्ण झाला की ती टीम विखुरली जाते. तुम्ही स्वतःची क्षमता दाखवून दिली आणि प्रभाव निर्माण केला तर तुमची मागणी वाढू शकते नव्या गिग साठी तुम्हाला निवडण्यात येऊ शकते.

गिग वर्क कल्चर हे जग खूप वेगळे आहे. त्यासाठी नवा दृष्टिकोन आणि नवे कौशल्य यांची गरज आहे. हा दृष्टिकोन देण्याचे काम हे पुस्तक करेल त्यामुळेच गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाचे महत्व आणि गरज खूप जास्त आहे. या नव्या जगाची ओळख करून घ्यायची असेल तर हे पुस्तक सर्वोत्तम मार्गदर्शकाचे काम करेल यात शंका नाही.

भविष्यातल्या कामाचे स्वरूप आणि गिग कल्चरमध्ये काम करण्यासाठी जी कौशल्य लागणार आहेत. त्याचा विचार केला तर पाच प्रमुख गोष्टी लक्षात येतात.

  1. सतत शिकत रहा– डार्विन असे म्हणतो वेगाने बदलणाऱ्या जगात जे सक्षम आहेत तेच जगतील असे नाही. तर जे परिस्थितीशी जुळवून घेतील ते जिवंत आणि टिकून राहतील या गतिशील जगात वाट शोधताना आपल्याला प्रगती करायची असेल तर नवी कौशल्य शिकण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही.
  2. नेटवर्किंग शिका– आपण सगळेच एकमेकांशी अनेक अर्थाने जोडले गेलेल्या दुनियेत जगत आहोत. त्यामुळे आपले नेटवर्क किती मजबूत आहे. त्यावर आपली यश अवलंबून असते आपण निवडलेला भवताल  आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचे अतूट नाते असते. तो भवताल  कसा आहे त्यावरच यश अवलंबून असते. आपण नातेवाईक निवडू शकत नाही. पण निश्चितच आपण आपले मित्र सोबती सवंगडी कुठले असावेत हे निवडू शकतो.
  3. आर्थिक व्यवस्थापनाची जाणीव– सध्या बहुतांश तरुण मंडळी आपल्या पालकांपेक्षा जास्त पैसे कमवतात गिग वर्क कल्चर मुळे महिन्याचे ठराविक उत्पन्न ही संकल्पना आता बाद होत आहे. प्रोजेक्ट पूर्ण करा आणि पैसे घ्या असा आता जमाना आहे. अशा काळात पैशांचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाच्या आणि कठीण काम आहे.त्यामुळे वेळेचे आणि पैशांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
  4. विक्रीचे कौशल्य– सेल्स म्हणजे विक्री करणे हे आपले नाही तर दुसऱ्यांचे काम आहे. असे इंजिनियर आणि तंत्रज्ञ यांना वाटते असे मला आढळून आले आहे. याउलट वस्तूस्थिती ही आहे की विक्री करण्याचे कौशल्य हे प्रत्येकाला आले पाहिजे सध्याच्या गिग कल्चर मधला हा गंभीर मुद्दा आहे. नवीन का मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मध्ये असलेले कौशल्य हे सेल करता आलेच पाहिजे.
  5. संयम आणि सातत्य– आयुष्य हे थोड्या अंतरासाठी धावण्यासारखे नाही तर मॅरेथॉन सारखे आहे. उत्तम व्यवसाय करायचा असेल करियर घडवायचे असेल तर दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सगळ्यात आवश्यक घटक आहेत संयम आणि सातत्य

प्रत्येक गोष्ट ही शक्य तितकी इतकी सोपी करावी हा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सिद्धांत प्रफुल्ल वानखेडे यांनी मांडला. पण ही सोपी गोष्ट आचरणात आणायला तेवढी सोप्पी नसते हे या पुस्तकातून दिसून येते. अतिशय उगवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचायला सोपे आणि चित्त वेदक आहे प्रफुल्ल देशपांडे  यांनी अनुभवांच्या गोष्टींच्या आणि सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत. त्यातून वाचकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या रोजच्या शैलीमुळे त्यातला आशय हा वाचकांच्या कायम आठवणीत राहील याची खात्री आहे.

प्रफुल्ल देशपांडे  यांचा सगळा प्रवास हा विलक्षण आहे. साताऱ्यात वाढलेला एक बुद्धिमान युवक मोठे स्वप्न पाहतो स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतो नियोजन सातत्य आणि कठीण परिश्रमाची जोड देऊन ते स्वप्न पूर्ण करतो अपूर्व यश मिळवतो. आणि करियरच्या  एका नव्या उंचीवर नेतो त्यांचा हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे.

आपण जे शिकलो ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा निश्चय आणि धडपड अतिशय कौतुकास्पद आहे. या पुस्तकात त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये आणि विचार सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत.

या पुस्तकाला रिव्ह्यू करण्याची संधी मला मिळाली हा माझा सन्मान समजतो प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावी असे हे  पुस्तक आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल नवी उमेद मिळेल.

आपलाच

डॉ. पंकज नाईकवाडी

सहाय्यक प्राध्यापक , रसायनशास्त्र विभाग

Submit Your Review You are not allowed to submit a review. Please Log In

Scroll to Top